विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कचरेवाडी येथील सरगर परिवार यांची सांत्वनपर भेट घेतली.

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बिज उत्पादन सहकारी संस्थेचे व्हा. चेअरमन हनुमंत सरगर यांना मातृशोक.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कचरेवाडी येथील सौ. कमल नामदेव सरगर यांचे दुःखद निधन झालेले होते. सरगर परिवार यांच्या कचरेवाडी येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट दिलेली होती. त्यावेळेस माळशिरस ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामदास काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वर्गीय सौ. कमल नामदेव सरगर ह्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर हनुमंतराव सरगर यांच्या मातोश्री होत्या. त्या सुसंस्कृत स्वभाव व सेवाभावी वृत्तीच्या होत्या‌. कोरोनाच्या कालावधीमध्ये प्रति मायाक्का चिंचणी यात्रा करण्यामध्ये स्वर्गीय कमलबाई यांचा सिंहाचा वाटा होता.

सरगर परिवार आणि मोहिते पाटील परिवार यांचे गेली तीस वर्षापासून राजकीय सलोख्याचे संबंध आहेत. एकनाथ निवृत्ती सरगर माळशिरस व कचरेवाडी संयुक्त ग्रामपंचायत असताना त्याकाळी ते ग्रामपंचायत सदस्य होते. कचरेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर नामदेव एकनाथ सरगर ग्रामपंचायत सदस्य होते तर हनुमंतराव सरगर यांनी उपसरपंच पदावर कार्य केलेले आहे‌. कचरेवाडी गावामध्ये सरगर परिवाराचे मोठे कुटुंब आहे.

एकनाथ सरगर यांना नारायण, नामदेव, शिवाजी, दत्तात्रेय, लक्ष्मण, रामचंद्र आणि शंकर अशी मुले तर शेषाबाई पाटील चाकोरे, द्रोपदा कचरे कचरेवाडी अशा दोन मुली होत्या. सरगर परिवाराने शेतीबरोबर उद्योग व्यवसायात गरुडभरारी घेतली आहे‌‌. माळशिरस येथे हॉटेल योगेश्वर, हॉटेल अमृता व जय हनुमान स्क्रॅप मर्चंट आणि अमृता ब्लॉक फेवर अशा उद्योग व्यवसायामध्ये आहेत.

संपूर्ण सरगर परिवार एका विचाराने असतात. सुख-दुःखाप्रसंगी सर्व एकत्र येत असतात. सरगर परिवार आणि मोहिते पाटील परिवार यांचे 1995 सालापासून आजपर्यंत राजकीय सलोख्याचे संबंध आहेत. ते एकमेका़ंच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असतात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleBest 3 Reasons Why You Need a Virtual Data Place
Next articleप्रेरणादायी बातमी : सार्वजनिक बांधकाम मंडळाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार गोविंद कर्णवर पाटील यांना मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here