मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विशेष कार्यअधिकारी म्हणून काम पाहिलेले श्रीकांतजी भारतीय यांचा विधान परिषदेवर भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य व भाजपचे जिल्हा प्रभारी के. के. पाटील यांनी सन्मान केला. यावेळी श्रेया भारतीय उपस्थित होत्या.
श्रीकांत भारतीय आणि के. के. पाटील यांचे राजकीय संबंधांबरोबरच मैत्रीचे सलोख्याचे संबंध आहेत. श्रीकांतजी भारतीय यांनी विशेष कार्यअधिकारी असताना माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित कामांना गती दिली होती. मळोली-निमगाव रस्त्यांची दुरवस्था झालेली होती, त्यावेळेस श्रीकांतजी भारतीय यांनी अडीच कोट रुपये निधी रस्त्यासाठी के. के. पाटील यांच्या मागणीने मंजूर केलेला होता. अशी अनेक छोटी मोठी कामे केलेली होती.
माळशिरस विधानसभेच्या आ. राम सातपुते यांच्या विजयाचे पडद्यामागील खरे चाणक्य श्रीकांतजी भारतीय आहेत. सभेच्या निवडणुकीच्या वेळी माळशिरस तालुक्यातील अनेक नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा संबंध आलेला होता. मात्र के. के. पाटील यांचे अनेक दिवसांपासून राजकीय व मित्रत्वाचे संबंध आहेत. के. के. पाटील, श्रीकांतजी भारतीय विधान परिषदेत व विधान सभेत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते असे हक्काचे दोन आमदार झालेले आहेत.

श्रीकांतजी भारतीय यांचे नाव विधान परिषदेचे उमेदवार घोषित केल्यापासून माळशिरस तालुक्यातील नेते व कार्यकर्ते यांचे परिचित असणारे आमदार होणार असल्याने तालुक्यातील भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते. के. के. पाटील यांनी मुंबई येथे जाऊन नवनिर्वाचित आमदार श्रीकांतजी भारतीय यांचा सन्मान करून मैत्रीचे नाते अधिक दृढ केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng