माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्तृत्व व बुद्धिमत्तेच्या आधारे विधी क्षेत्रामध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख करणारे सुप्रसिद्ध सरकारी वकील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. उज्वल निकम क्षेत्रातील परीस समजले जातात. अशा परिसाच्या संपर्कात माळशिरस तालुक्यातील एकशिव गावचे थोर सुपुत्र ॲड. प्रशांत रुपनवर मार्गदर्शनासाठी कायम संपर्कात असतात.
ॲड. उज्वल निकम यांनी समाजामध्ये गैरकृत्य करणाऱ्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी बाजू मांडत असताना अनेक घटनांचा व विषयांचा परामर्श घेत असतात. मोठ्या गंभीर खटल्याच्या वेळी अनेक क्षेत्रातील वकील मंडळी त्यांचा युक्तिवाद ऐकत असतात. परिसाच्या संपर्कात आल्यानंतर जसे लोखंडाचे सोने होते तसे ॲड. उज्वल निकम यांच्या संपर्कात आल्यानंतर ज्ञानात भर मिळून बुद्धी तेज होते. यासाठी ॲड. प्रशांत रुपनवर कायमच त्यांच्या संपर्कात असतात, त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. सध्या त्यांच्याकडे नोटरी करण्याचे काम आहे.
मुंबई येथील उच्च न्यायालयात कामानिमित्त गेल्यानंतर आवर्जून ॲड. उज्वल निकम यांची भेट घेऊन मार्गदर्शन व सल्ला घेत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ॲड. प्रशांत रुपनवर यांनी कमी वयामध्ये वकिली व्यवसायांमध्ये आपले नाव माळशिरस तालुक्यात वेगळे कोरलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng