विना परवानाधारक अन्न व्यावसायिकांसाठी विशेष मोहीमेचे आयोजन

पुणे (बारामती झटका)

विना परवानाधारक अन्न व्यावसायिकांचा शोध घेत त्यांना परवाना घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.

या मोहिमे अंतर्गत अन्न व्यावसायिकांनी www.foscos.fssai.gov.in या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करून अन्न परवाना व नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. वार्षिक उलाढाल रुपये 12 लाखापेक्षा कमी असलेल्या अन्न व्यावसायिकांना वार्षिक शुल्क 100 रुपये, वार्षिक उलाढाल रुपये 12 लाखापेक्षा अधिक  किरकोळ तसेच घाऊक विक्रेता व हॉटेलसाठी अन्न परवाना वार्षिक शुल्क 2 हजार रुपये, छोटे उत्पादक 3 हजार रुपये व मोठे उत्पादक 5 हजार रुपये अदा करुन नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेता येईल.

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना परवानाधारक आस्थापनाकडून खरेदी करावी. प्रत्येक नागरिकास सुरक्षित अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यास हातभार लागण्यासाठी या मोहिमेचा फायदा होणार आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सजग रहावे. याबाबत अधिक  माहितीसाठी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 020-25882882 यावर संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी  केले आहे.

Previous articleलोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय
Next articleजिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here