विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजन…

सौ. यशोदा सुग्रीव हुलगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

गोरडवाडी ( बारामती झटका )

गोरडवाडी ता. माळशिरस येथे विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे सुश्राव्य किर्तन रविवार दि. 29 मे 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये स्वर्गीय सौ. यशोदा सुग्रीव हुलगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोरडवाडी येथील निवासस्थानी होणार आहे.

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुश्राव्य किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमती तानुबाई साहेबराव हुलगे, श्री. सुग्रीव साहेबराव हुलगे, श्री. बिभीशण सुग्रीव हुलगे, श्री. विष्णू सुग्रीव हुलगे, श्री. तात्या साहेबराव हुलगे, श्री. किसन साहेबराव हुलगे आणि समस्त हुलगे परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्यास नम्र आवाहन आहे.

विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांना हनुमान तरुण भजनी मंडळ गोरडवाडी व भजनी मंडळ डोंबाळवाडी हे किर्तनाला साथ देणार आहेत. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन हुलगे परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदेहू-आळंदी-पंढरपूर पायी चालणाऱ्या वारकर्‍यांना दिलासा व पर्यावरणाचा समतोल राखणारा स्तुत्य उपक्रम – माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील.
Next articleस्वेरी फार्मसीच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश माळशिरस तालुक्यातील प्राजक्ता गोरख जानकर हिने तरंगफळचा झेंडा रोवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here