विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा संक्रांतीनिमित्त श्रीकांत देशमुख यांचेकडून तिळगूळ देऊन सन्मान.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या ध्येय धोरण विषयी सविस्तर चर्चा.


मुंबई ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांचा मुंबई येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी संक्रांतीनिमित्त तिळगूळ देऊन मानाची सोलापुरी शाल व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शशिकांत भाऊ देशमुख व युवा नेते शाहूराजे देशमुख उपस्थित होते.


सोलापूर जिल्ह्यामध्ये आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद यांच्या निवडणुकीविषयी भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हावर निवडणूका लढवाव्यात प्रत्येक गावात व प्रभागांमध्ये बूथ प्रमुख व शक्ती प्रमुख नेमून एक बुथ पंचवीस युथ अशाप्रकारे नियोजन करून आगामी काळामध्ये जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निवडून येण्यासाठी रणनीती आखावी. पक्षाच्या विरोधामध्ये असणाऱ्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची गय करू नये आपल्या स्तरावरून निर्णय घेण्याच्या सूचना करून सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम समाधान कारक असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांनी शाबासकीची थाप मारत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देशमुख परिवारांना दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहकाराच्या तंबुत घुसले खाजगिकरणाचे उंट सहकाराला लागले ग्रहण
Next articleWrite-up tattoo ranch versailles Impressionism

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here