विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा.

माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर आणि भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या निवेदनाचे पडसाद विधिमंडळात उमटले.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांनी शेतकऱ्यांची विज कनेक्शन कट करण्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली होती. सभागृहामध्ये ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांना तीन महिन्याकरता लाईट कनेक्शन कट करण्याचा निर्णय थांबवण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांनी बारामती येथील महावितरण परिमंडल कार्यालय येथे निवेदन देऊन सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांना पाठवलेल्या असल्याने लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माळशिरस तालुक्यामुळे दिलासा मिळालेला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर व माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस संजय देशमुख बारामती येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालय येथे प्रशासन अधिकारी महावीर शेंडगे यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन कट करण्याचे काम थांबवा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देऊन अधिकाऱ्यांची चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या होत्या.

भाजपच्यावतीने दिलेल्या निवेदनामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर यांच्यावतीने आपणास विनंती करण्यात येत आहे की, शेतकरी अगोदरच कोरोना महामारी, अवकाळी पाऊस, वारा आदीमुळे होरपळला आहे. आणि आता शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन तोडली जात आहेत. शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा पैसा उपलब्ध नाही त्यामुळे लाईट बिल या स्थितीला तरी भरू शकत नाहीत. त्यामुळे आपण हे लाईट कनेक्शन तोडणी थांबवावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर यांच्यावतीने माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलेला होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांना थेट निवेदन मिळालेले असल्याने आक्रमक भूमिका घेऊन तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांचे शेतकरी वर्गातून अभिनंदन होत असून त्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबीर
Next articleमोटेवाडी येथील राजु हुलगे यांचे दुःखद निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here