विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांचे खंदे शिलेदार आमदार राम सातपुते मुंबई येथे तळ ठोकून आहेत.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर करडी नजर…

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊन सत्ता बदलाचे वारे जोराने वाहू लागलेले आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची करडी नजर असून मुंबई येथे तळ ठोकून आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस हे आमदार राम सातपुते यांचे राजकीय गुरु आहेत. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्रजी फडवणीस आपली भूमिका सक्षमपणे बजावीत असताना कायम आमदार राम सातपुते यांनी शिष्याची भूमिका घेतलेली आहे. अनेक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन सरकारला धारेवर धरलेले आहे. कायम देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राम सातपुते यांचे कामकाज सुरू असते.

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. राजकीय उलथापालथ करण्याकरता आमदार राम सातपुते देवेंद्रजी फडवणीस यांच्या खांद्याला खांदा लावून आहेत. सध्या मुंबईमध्ये राजकीय घडामोडी घडत असल्याने आमदार राम सातपुते मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. महत्त्वाच्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदिवंगत चुलत बंधूच्या उपकाराची उतराई, विधवा वहिनीशी लग्न करून दिराचा मोठेपणा…
Next articleसदाशिवनगर गावठाणाचा प्रश्न सोडवा अन्यथा, मतदानावर बहिष्कार घालणार – युवा नेते ऋषिकेश बनसोडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here