इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील भिगवण येथे कालिदास भगवानराव बंडगर, मदनवाडी यांची कन्या जानवी यांच्या विवाहानिमित्त वधुवरांना शुभेच्छा देण्याकरिता गेले असता नवरदेव हे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी नवरदेव यांचा फेट निघाला, ही गोष्ट राजवर्धन पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः नवरदेवाचा फेटा नीट बांधला व विवाहानिमित्त शुभेच्छा दिल्या.
राजवर्धन पाटील यांच्या या आपुलकीचे दर्शन या ठिकाणी असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना होऊन त्यांना सुखद असा अनुभव यावेळी अनुभवास आला. राजवर्धन पाटील यांची नेहमी सहकारी वृत्ती अनेक प्रसंगी दिसून आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng