शेतकऱ्याकडून चार हजाराची लाच घेताना विस्ताराधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.
बीड (बारामती झटका)
विहिरीचे बील काढण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीमधील कृषी विभागाच्या विस्तार अधिकार्यास रंगेहात पकडण्यात आले. लाचखोर अधिकार्याला लाचलूचपत विभागाने पकडल्याने परळी येथील शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील एका शेतकर्यास राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विहिर मंजूर झाली होती. विहिरीचे बील काढण्यासाठी पंचायत समिती विभागातील कृषीचे विस्तार अधिकारी संजय पालेकर लाचेची मागणी करत असे. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी शेतकर्याने लाचलूचपत विभागाशी संपर्क साधला होता. सापळा रचून लाचलूचपत विभागाने विस्तार अधिकारी संजय पालेकर यास 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई बीड एसीबीचे रविंद्र परदेशी व त्यांच्या टीमने केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng