केज (बारामती झटका)
केज तालुक्यातील सोनीजवळा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींच्या कामात सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी गैरव्यवहार केला. एका शेतकऱ्याच्या शेतात दि. २४ मे २०१६ ते दि. २९ मे २०२० या कालावधीत त्याच्या परस्पर विहीर खोदल्याचे दाखवत भ्रष्टाचार केल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे शुक्रवारी लेखी तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे.
सोनीजवळा येथील मुक्ताबाई भिमराव बचुटे यांच्या नावे सर्वे नं. १०३ मध्ये जमीन असून, सदरील जमीनीमध्ये जुनी विहीर आहे. सदर शेतकऱ्याच्या परस्पर सर्वे नंबर १०३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांनी दि. २४ मे २०१६ ते दि. २९ मे २०२० या कालावधीत नवीन विहीर दाखवून विहिरीचे पैसे उचलून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार मुक्ताबाई भिमराव बचुटे यांचा मुलगा जयराज भीमराव बचुटे यांनी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान, येथील ग्रामसेवकाने हे प्रकरण माझ्या कार्यकाळातील नसून जुने आहे. याबाबत आपणाला काहीही माहिती नाही, असे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng