पुणे (बारामती झटका)
वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंर्तगत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देण्यात आली होती. याबाबत यंत्रमाग घटकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनीधी यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मुदत दि. ३१ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आली होती.
मुदतवाढ देवूनही या मुदतीत बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केली नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. सदर अर्ज नोंदणी करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली होती.
या मुदतीत देखील बहुतांश प्रकल्पांनी नोंदणी केलेली नसल्याने या उद्योगांना नोंदणी करण्यासाठी तीन महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी संबंधीत यंत्रमाग घटकांनी मुदतीपुर्वी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन (२७ अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng