वीज पडण्याआधी मिळणार आता सूचना, जीवित व वित्त हानी टळणार…

मुंबई (बारामती झटका)

आकाशातून जमिनीवर वीज कोसळण्याआधी पंधरा मिनिटे सूचना दामिनी ॲप द्वारे मिळण्यास होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात आणि अवकाळी पावसाच्यावेळी देखील वीज पडून प्रचंड नुकसान होण्याच्या घटना घडत असतात. वीज पडून जीवितहानी होते आणि पाळीव पशू देखील मृत्युमुखी पडतात. काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. शेतात शेतकरी राबत असतो आणि पावसाच्या दिवसात तर त्याला शेतात काम करणे अपरिहार्य ठरत असते. आकाशात विजांचा कडकडाट होत असतो, मेघगर्जना होत असतात आणि अचानक मोठा आवाज करीत कुठेतरी वीज कोसळत असते. विज कधी आणि कुठे पडणार याचा काहीच अंदाज नसतो आणि त्यामुळे कोणत्याही भागात हा धोका सतत असतो. वीज कोसळण्याची सूचना आधीच मिळाली तर सावधगिरी बाळगत येते. भारत सरकारच्या दामिनी ॲपने हीच सुविधा दिली आहे.

जून, जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात वीज पडण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी भारत सरकारच्या दामिनी ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची पुर्वसूचना मिळणार आहे. आकाशातून वीस कोसळणार असल्याची माहिती आधीच पंधरा मिनिटे मिळू शकणार आहे. या सूचनेमुळे आधीच संकटाची चाहूल लागत असून यामुळे होणारी जीवित हानी टाळता येणार आहे. जेथे वीज पडणार आहे ते ठिकाण आणि तो २० ते ४० कि.मी. अंतराचा परिसर या ॲपवर दाखवला जाणार आहे शिवाय या ॲपवर ‘बिजली की चेतावनी हे’ अथवा ‘बिजली की चेतावनी नही है’; असे संदेश देखील दिले जाणार आहेत. दर पाच मिनिटाला या वरील माहिती अपडेट होणार आहे

जिवितहानी टाळता येईल

वीज पडणार असल्याची आधी माहिती मिळाली तरी कोसळणारी वीज थांबवता येणार नाही. परंतु त्यामुळे होणारी जीवित हानी मात्र नक्की टाळता येणार आहे. पंधरा मिनिटे आधीच माहिती मिळणार असल्यामुळे येणाऱ्या संकटाची माहिती आधीच मिळाल्याने त्वरित सावधगिरी बाळगणे सोपे जाणार आहे. या माहितीमुळे वीस पडण्यापासून होणारे मृत्यू निश्चित थांबू शकणार आहेत.

प्रशासनाला सूचना

सदर ॲप वापरण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.संकटाची सूचना आधीच मिळणार असल्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी वाचवण्यासाठी हे ॲप अत्यंत उपयोगाचे ठरणार आहे. पंधरा मिनिटे आधीच संकटाची सूचना मिळणार असल्याने दक्षता घेण्यास १५ मिनिटांचा कालावधी मिळत आहे.

जीपीएस लोकेशनने काम

सदर ॲप जीपीएस लोकेशनने काम करणार असल्याने अचूक माहिती मिळणार असून प्रशासकीय यंत्रणेला देखील वेळीच संकटाची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. भारत सरकारच्या मंत्रालयाच्या वतीने हे ॲप तयार करण्यात आले आहे आणि हे दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे. सदर ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून संकटाची माहिती आधीच घेता येणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचांदापूरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ८० रक्तदात्यांचे रक्तदान
Next articleपावसाळ्यातील वीजेपासून मनुष्य, पाळीव प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करा – सतीश कचरे, मंडळ कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here