वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वराच्या नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज यांच्या वास्तव्याने पुण्यवान झालेल्या वेळापूर नगरीत शिवकृपा कृषी सेवा केंद्राचा धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात उद्घाटन समारंभ मुंगूसकर परिवार यांनी केलेला आहे. शिवकृपा कृषी सेवा केंद्राचा शुभारंभ श्री अर्धनारी नटेश्वर व परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून व स्वर्गीय हरिभाऊ मुंगूसकर यांचा आशीर्वाद घेऊन कृषी केंद्राचा धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात शुभारंभ केलेला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती व वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वेळापूरचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये स्वर्गीय हरिभाऊ शंकरराव मुंगूसकर पाटील यांनी काम केलेले आहे. त्यांची मनोमन इच्छा होती कि, शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या दृष्टीने वाजवी दरामध्ये व दर्जेदार खते, बी-बियाणे, औषधे याचे दुकान सुरू करावयाचे. त्यांची इच्छा दूधगंगा दूध सोसायटीचे चेअरमन तानाजीराव हरिभाऊ मुंगूसकर पाटील यांचे चिरंजीव रायबा मुंगुसकर पाटील यांनी डिग्रीचे शिक्षण पूर्ण करून शिवकृपा कृषी सेवा केंद्र वेळापूर येथे सुरू करून केली आहे.

त्यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी किमतीमध्ये रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके, शेती औषधे, शेती विषयक योग्य सल्ला असा शेतकऱ्यांसाठी व्यवसाय सुरू केलेला आहे. वेळापूर पंचक्रोशीमध्ये शेती व्यवसाय जोमाने सुरू आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहेत उत्पन्नामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वेळापूर परिसरामध्ये बागायती क्षेत्राला शिवकृपा कृषी सेवा केंद्राचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातील व शेती विषयक सल्ल्यासाठी रायबा मुंगूसकर पाटील 86 68 51 44 51 व 95 03 91 41 33 या नंबरची संपर्क साधावा, असे आवाहन शिवकृपा कृषी केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
