लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे वेळापूर नगरीत महादेव देवालय ट्रस्टच्यावतीने जंगी स्वागत.

वेळापूर ( बारामती झटका )
भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी वेळापूरचे आराध्य दैवत महादेव मंदिर येथील अर्धनारीनटेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे जंगी स्वागत वेळापूर नगरीमध्ये करण्यात आले. त्यांचा सन्मान देवस्थानचे पुजारी यांनी गाभाऱ्यामध्ये करून त्यांना मानाचे श्रीफळ देण्यात आले तर भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष, वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमरसिंह सूर्यकांत माने देशमुख यांनी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा सन्मान केला.
वेळापूरचे ग्रामदैवत महादेव मंदिरामध्ये अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आहे. जगाच्या पाठीवर कोठेही पिंडीवर शंभू महादेव आणि पार्वती यांची मूर्ती असणारे दुसरे कोणतेही ठिकाण नाही. वेळापूर हे प्राचीन काळापासून प्रचलित आहे. वेळापूर पंचक्रोशीमध्ये १४ हेमाडपंथी मंदिरे आहेत. पुरातत्व खात्याकडे मंदिर आहेत. वेळापूरच्या शंभू महादेवाला पंचक्रोशीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याच्यावेळी शंभू महादेवाचा आशीर्वाद घेतला जातो. माळशिरस तालुक्यामध्ये विविध विकास कामे व जनतेच्या अडीअडचणी, भेटीगाठी यासाठी लोकप्रिय आमदार राम सातपुते तालुक्याच्या पिलीव भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आवर्जून महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्धनारीनटेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी अनेक नेते व कार्यकर्ते यांच्यासह विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng