वेळापूर येथील बांधकामाचा वाद माळशिरस न्यायालयात गेल्यानंतर प्रतिवादी मन्सूर शेख व इतर यांनी कैफियत व मनाई अर्जात अनेक शंका-कुशंकांचे केले निरसन.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर-अकलूज रोडवरील सुमित्रा नगर या ठिकाणी मन्सूर शेख यांचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाची उलट सुलट चर्चा सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
मन्सूर शेख यांचे मूळ गाव हैदराबाद आहे. गेली अनेक वर्षापासून वेळापूर येथे फरशी बसवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी चांगला व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवलेले आहे. वेळापूरमध्ये दोन-तीन ठिकाणी त्यांनी जागा देखील घेतल्या असून त्यांनी सुमित्रानगर येथे बांधकाम सुरू केलेले आहे. बांधकामाची रचना बंगला अथवा वाडा अशी वाटत नाही. सदरचे सुरू असलेले बांधकाम मदरसा, मशिद असावी असा स्थानिक नागरिकांचा बांधकामावरून संशय वाढलेला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत पोलीस स्टेशन येथे सदर बांधकामाविषयी तक्रारी केल्या आहेत. बांधकाम करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध नाही मात्र, लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मदरसा मस्जिद होऊ नये, यासाठी नागरिक संभ्रमात आहेत. काही नागरिक न्यायालयामध्ये सदर बांधकामाविषयी तक्रार करण्याच्या मानसिकतेत होते. वेळापूर पोलीस स्टेशन येथे सदर बांधकामाची तक्रार गेल्यानंतर बांधकामाचे मालक मन्सूर शेख यांनी मदरसा मस्जिद नसल्याचे लिहून दिलेले आहे. परंतु स्थानिक नागरिकांच्या मनामधील संभ्रम दूर झालेला नाही. त्यासाठी सदरच्या बांधकामाचा उपयोग फक्त राहण्यासाठी केला जाईल असे न्यायालयात कैफियत करावी, अशी स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. सदरच्या बांधकामाविषयी स्थानिक नागरिक संभ्रमावस्थेत होते .
शामराव किसन इंगोले व इतर 8 लोकांनी रे.मु .नंबर 08/ 2022 केलेल्या दाव्यास मन्सूर शेख ते 3 यांनी माळशिरस येथील मे. सिव्हिल सि.डी यांचे कोर्टात कैफियत व म्हणणे प्रतिज्ञापत्रावर सादर केलेले आहे. म्हणणे 1 ते 14 मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये सदरच्या जागेत कोणतीही मस्जिद मदरसा अथवा धार्मिक स्थळाचे बांधकाम करीत नसून करणार नाही. तसे करावयाचे असल्यास त्यासाठी आवश्यक ते त्या परवानगीची ज्ञात आहे. संपूर्णपणे व्यक्तिगत व खाजगी वापरासाठी आवश्यक असे बांधकाम केलेले आहे. ग्रामपंचायत वेळापूर यांचेकडे परवानगी सोबत दिलेले नकाशेमध्ये पण सदर बांधकाम जागेत स्वयंपाक घर, संडास, बाथरूम अहवाल इत्यादी स्पष्टपणे नमूद आहे. मशिदीमध्ये स्वयंपाकघर अगर संडास, बाथरूम बांधण्याचे कारण नाही. सदर जागेत कोणतीही मशिद मदरसा अगर धार्मिक स्थळ बांधत नसून बांधणार नाही असे यापूर्वीच स्थळ पाहणी नंतर ग्रामपंचायत वेळापूर व पोलीस स्टेशनमध्ये लेखी स्वरूपात दिलेले आहे. त्यामुळे त्या लेखी हमीचा भंग केल्यास सदरचे अधिकारी आवश्यक ती कारवाई करतील याचीपण पूर्ण जाणीव आहे. अशा अनेक बाबींचा उल्लेख करून 25/04/2022 रोजी कैफियत व म्हणणे दिलेले आहे. मन्सूर शेख व इतर दोन यांनी प्रतिज्ञालेख दिलेला सत्य प्रतिज्ञेवर कथन करून आमचे माहिती व समजुतीप्रमाणे खरा वन बरोबर मजकूर आहे. असे मान्य करून सदरच्या कैफियत वर सह्या मन्सूर शेख व इतर दोन लोकांनी केलेल्या आहेत.
वेळापूर येथील संशयास्पद बांधकामाचा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयातील कैफियतवरून स्थानिक नागरिकांचा संभ्रम सध्यातरी दूर झालेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng