वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार चोऱ्या होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न रामभरोसे नागरिक त्रस्त,पोलीस व्यस्त, चोर मस्त.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर तालुका माळशिरस येथील सुमित्रा कॉम्प्लेक्स येथील अकलाई इंटरप्राइजेस आपले सरकार सेवा केंद्राचे शटर उचकटून लोखंडी पट्ट्या तोडून चोरट्यांनी 11000 रुपयावर डल्ला मारलेला आहे दुकानाचे मालक प्रदीप शिवाजी शिंदे यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे 21 11 21 रोजी फिर्यादी जबाब दिलेला आहे. वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार चोऱ्या होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राम भरोसे झालेला असल्याचे त्रस्त नागरिकांच्या मधून बोलले जात आहे छोट्या-मोठ्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत पोलीस कोणत्या कामात व्यस्त आहे त्याची चिंता आहे तर चोरी करून पोलीस तपास करत नसल्याने चोर मस्त मजे मध्ये आहेत.
पुणे पंढरपुर रोडवर पालखी चौक ते एसटी स्टॅन्ड दरम्यान असलेले सुमित्रा कॉम्प्लेक्स या ठिकाणी चोरट्यांनी लोखंडी पट्ट्याचे शटर तोडून चोरी केलेली आहे. वेळापूर पोलीस स्टेशन आणि चोरीचे ठिकाण 100 मीटर अंतर आहे . अतिरेकी जसे हद्दीत घुसून हल्ला करतात तसे चोरांनी पोलीस स्टेशन हद्दीत चोरी करून गेलेले असल्याने पोलिस प्रशासनाच्या जागरूक राहून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. वेळापूर शहरात पोलीस स्टेशन असताना चोर चोरी करत आहे तर हद्दीमध्ये चोरांचा अनेक वेळा सुळसुळाट झालेला आहे अनेकांची गुरे रानातून चोरून नेले आहेत कित्येक लोकांच्या घरातील चोऱ्या झालेल्या आहेत त्याचा आद्यप तपास व उलगडा झालेला नाही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून सुद्धा चोर सापडत नसतील तर अनेक लोक चोरी होऊन सुद्धा तक्रार दाखल करण्याचे सोडून दिलेली आहे. वेळापूर पोलीस स्टेशन यांनी आज पर्यंत नोंद असलेल्या चोरीच्या किती गुन्ह्यांमध्ये चोरांना अटक केलेली आहे. किंवा चोरांची सेटलमेंट केलेली आहे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलिस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी तपासून पाहणे गरजेचे आहे. वेळापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पद असताना या पदावर पोलीस निरीक्षक पदाचा अधिकारी देऊन सुद्धा पोलीस स्टेशन हद्दीत चोरांचे वाढते प्रमाण कमी होत नाही यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे त्रस्त नागरिक यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng