वेळापूर गावातील आदर्श व्यक्तिमत्व, युवकांचा आदर्श, भविष्यातील उगवता तारा, संदीपतात्या…

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील युवा उद्योजक, आदर्शवत व्यक्तिमत्व, भविष्यातील उगवता तारा म्हणजे संदीपतात्या माने देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात व धूमधडाक्यात मित्र परिवार यांच्यावतीने साजरा करण्यात आला. संदीपतात्या यांच्या वाढदिवसानिमित्त उघडेवाडी गावचे उपसरपंच नितीनभैय्या चौगुले, डॉ. अमरसिंह माने देशमुख, उद्योगपती नितीन पाचपुंड, कलिंगड व्यापारी माधवराव कदम, सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल घाडगे, अशोकराव शिवपालक, विकास पाटील, वैष्णवी कलेक्शनचे मालक श्री. पवार, दैनिक पुढारीचे पत्रकार धनंजय पवार, बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संदीप माने देशमुख यांनी समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सुसंस्कृत स्वभाव, आदर्श आचार विचारांची देवाणघेवाण, कमी वयात पोक्त विचार, अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करणे अशा अनेक गुणांनी युक्त असणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा भविष्यामध्ये गावाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणार आहे, अशा दूरदृष्टीच्या युवा नेत्यावर वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी पिनूभाऊ येडगे यांची निवड
Next articleमातोश्री रेसिडेन्सीने राबवली “एक कुटुंब, एक झाड” संकल्पना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here