वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील जाधव यांनी पोलीस स्टेशनचा पदभार घेतला.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर पोलीस स्टेशनचे नूतन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील जाधव यांनी वेळापूर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सन्मान वेळापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आला. त्यावेळी समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेवराव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनी उमेश भानवसे, समता परिषदेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बबनराव गायकवाड वेळापूरचे माजी उपसरपंच मल्हारी बनकर, शिवगंगा दूध डेअरी चेअरमन भागवत गायकवाड, समता परिषदेचे वेळापूर शहराध्यक्ष शिवाजीराव मोहिते, प्रगतशील बागायतदार मल्हारीमामा शिंदे, शंकर आडत, उद्योजक सुखदेव आडत, पोलीस मित्र संघाचे अजित बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng