वेळापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नियुक्ती.

वेळापूरचे पोलीस निरीक्षक भगवानराव खारतोडे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात उचलबांगडी झाली.

वेळापूर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक भगवानराव खरतोडे यांची तडकाफडकी बदली होऊन सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षात रवानगी झालेली आहे त्यांच्या जागी अकलूज पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नियुक्ती झालेली आहे.
पोलीस निरीक्षक भगवानराव खरतडे यांची तडकाफडकी बदली नियंत्रण कक्षात झालेली असल्याने वेळापूर पोलीस स्टेशन चा पदभार पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आलेला आहे. तपासकामी बाहेर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव वेळापूर पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत.
वेळापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती असणारे पोलीस स्टेशन आहे सदर ठिकाणी पोलिस निरिक्षक भगवानराव खारतोडे यांची नियुक्ती सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तामामा भरणे यांच्या मतदार संघातील खारतोडे यांचे गाव असल्याने त्यांच्याकडे वेळापूर पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी पदाचा पदभार दिलेला होता.पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व स्तरातून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. बारामती झटका परिवारचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले होते. मात्र पोलीस स्टेशन हद्दीतील जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे.वेळापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कॉन्स्टेबल साठे यांच्या वाढदिवसानिमित्त नियमाला वगळून पोलीस प्रशासनाची प्रतिमेला गालबोट लागेल असे वर्तन केलेले असल्याने दीपक जाधव व साठे यांची रवानगी नियंत्रण कक्षात केलेली होती. भगवानराव खारतोडे यांनी गेल्या वर्षी जानेवारी 20 21 महिन्यात पदभार घेतला होता त्यांच्या कालावधीमध्ये वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गुन्हेगारी वाढलेली होती चोऱ्यामाऱ्या, दरोडे, खून, गोळीबार असे अनेक प्रकार घडलेले होते. गुन्हेगारी चोरी मधील आरोपी अटक करण्यामध्ये यशस्वी झालेले नव्हते विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक भगवानराव खारतोडे यांच्यावर हल्ला झालेला होता त्यांना त्यांच्यावर हल्ला करणारे आरोपी सुद्धा अटक करता आले
नाहीत दुर्दैवाची गोष्ट आहे.
ह वेळापूर पोलीस स्टेशनचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असल्याने सोलापूर ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी भगवानराव खारतोडे यांची सोलापूर येथे नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नियुक्ती केलेली आहे. वेळापूर पोलीस स्टेशन येथून थेट नियंत्रण कक्षात गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व पोलीस निरीक्षक भगवानराव खरतोडे पोलीस स्टेशन च्या इतिहासात दोन अधिकारी नियंत्रण कक्षात थेट गेलेले आहेत.


साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी करमाळा, टेंभुर्णी ,अकलूज येथे पोलीस प्रशासनात सेवा बजावलेली आहे टेंभुर्णी येथे पोलीस निरीक्षक पदाचा अधिकाऱ्याची नेमणूक असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याकडे टेंभुर्णी पोलीस स्टेशन चा पदभार होता त्यांनी यशस्वीपणे पदभार सांभाळला होता. सध्या त्यांची नेमणूक अकलूज पोलीस स्टेशन येथे होती त्यांच्याकडे वेळापूर पोलीस स्टेशन येथे पदभार दिलेला आहे. प्रशासनातील दांडगा अनुभवयाचा फायदा वेळापूर पोलीस स्टेशन पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनतेला होईल अशी अपेक्षा आहे. सुनील जाधव सज्जनांचा सन्मान आणि दुर्जन व गुन्हेगारांचा सहार करणारे अधिकारी आहेत. बोकाळले अवैद्य व्यवसाय दारू, अवैद्य वाळू उपसा, गुन्हेगारी प्रवृत्ती यावर निश्‍चितपणे आळा बसेल आणि वेळापूर पोलीस स्टेशनचे गतवैभव प्राप्त होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नेमणूक झालेली असल्याने सर्वसामान्य जनतेला वाटत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम.
Next articleवैष्णवी काळे हिच्या वाढदिवसानिमित्त संभाजी बाबा मंदिर येथे भाविकांना खिचडी व केळीचे वाटप होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here