वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथे अर्धनारी नटेश्वर यात्रा सालाबादप्रमाणे होणार आहे. अर्धनारीनटेश्वर यात्रा उत्सव 2022 या सालाकरिता उद्योजक सुखदेव आडत,(अंबानी) यांची अध्यक्षपदी तर उद्योजक उमेश भाकरे आणि लखनतात्या मंडले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
जगाच्या पाठीवर वेळापूर येथे पिंडीवर अर्धनारीनटेश्वर मूर्ती असणारे एकमेव देवस्थान आहे. अशा देवस्थानचा पारंपारिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. वेळापूर पंचक्रोशीमधील अनेक भक्त आवर्जून सर्व कार्यक्रमाला उपस्थित असतात. मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सालाबाद प्रमाणे अर्धनारीनटेश्वर यात्रा महोत्सव होणार आहे. श्रींचा हळदी सोहळा बुधवार दि. 06/04/2022 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. श्रींचा लग्न सोहळा शनिवार दि. 09/04/2022 रोजी रात्री बारा वाजता होणार आहे. श्रींची वरात व पालखी आणि साड्याचा सोहळा शनिवार दि. 16/04/2022 रोजी रात्री बारा वाजता होणार आहे. श्रींची सोळावी व जागरण गोंधळ सोहळा शनिवार दि. 23/04/2022 रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायण पूजा व संध्याकाळी सात वाजता जागरण गोंधळ कार्यक्रम होणार आहे.

आलेल्या सर्व भक्तांसाठी शनिवार दि. 09/04/2022 रोजी लग्न सोहळ्याच्या दिवशी दुपारी एक वाजले पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अर्धनारीनटेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुखदेव आडत (अंबानी) व उपाध्यक्ष उमेश भाकरे आणि लखनतात्या मंडले यांनी केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
