महादेव देवालय ट्रस्ट व पिसेवाडी ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात सत्कार संपन्न.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा महोत्सव कमिटी 2022 या वर्षातील यात्रा महोत्सवाच्या उपाध्यक्षपदी युवा उद्योजक उमेश भाकरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान पिसेवाडीचे माजी सरपंच सुरेश पिसे, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतभैय्या सूर्यकांत माने देशमुख, क्रांतिसिंह प्रतिष्ठान अध्यक्ष अण्णा शेंडे, पिसेवाडीचे उपसरपंच मोहन भाकरे, युवा नेते धनूभैया माने देशमुख, नवनाथ भाकरे, स्वप्निल माने देशमुख, दाजी पिसे, मारुती सोनबा पिसे या सर्वांनी सन्मान करून भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष उद्योजक उमेश भाकरे यांचा सुसंस्कृत स्वभाव, मनमिळावू व्यक्तिमत्व, सर्व जाती धर्मातील लोकांना अडचणीत मदत करण्याची भावना यामुळे शेती व उद्योग व्यवसायामध्ये वेळापूर पंचक्रोशीत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अशा उमद्या तरूण व्यक्तिमत्वास अर्धनारीनटेश्वर यात्रा कमिटीच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे. श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये श्रींचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. निश्चितपणे आलेल्या सर्व लोकांना सुविधा व नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng