सोलापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला.
वेळापूर ( बारामती झटका )
श्री. सुखदेव मारुती शिंदे यांची सुकन्या चि.सौ.कां. पूजा उर्फ चिऊ आणि श्री. ज्ञानोबा यशवंत निकम रा. केसकरवाडी, ता. पंढरपूर यांचे चि. प्रवीण यांचा शाही शुभविवाह सोहळा तांदुळवाडी येथील कारंडेज सगुना हॉल येथे वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला.
वेळापूरचे शिंदे आणि केसकरवाडीचे निकम यांचा शाही विवाहसोहळा रविवार दि. 22/05/2022 रोजी दु. 12.23 या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेला होता. मराठमोळ्या शिवशाही पद्धतीने शाही विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला होता. वधू आणि वरांना घोड्यावर बसवून वाजत गाजत भव्य मंडळाच्या स्टेजवर आणण्यात आले होते.

सदरच्या विवाह सोहळ्यास वेळापुर पंचक्रोशी व केसकरवाडी पंचक्रोशीतील शिंदे व निकम यांचे मित्र परिवार, नातेवाईक त्याचबरोबर राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या शाही शुभविवाहासाठी वेळात वेळ काढून वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव उपस्थित होते. त्यांचा सन्मान युवा उद्योजक पिंटूशेठ शिंदे यांनी केलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
