वेळापूर ( बारामती झटका )
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त वेळापूर तालुका माळशिरस येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकामध्ये शिवप्रेमींनी लाईट डेकोरेशन व चौकाचे स्वच्छता करून सुशोभीकरण केलेले असल्याने चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्यभागी असलेल्या पुतळ्याचे लाईट डेकोरेशन मुळे खास आकर्षण ठरलेले आहे.
वेळापूर नगरीला ऐतिहासिक वारसा आहे या नगरीमध्ये अर्धनारी नटेश्वर मंदिरामुळे परमपूज्य भाईनाथ महाराज यांच्या वास्तव्यामुळे आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेळापूरच्या पावन नगरीला अनन्य साधारण महत्व आहे अशा महत्त्वपूर्ण पावन नगरीमध्ये पुणे पंढरपूर व इंदापूर सांगोला महामार्गाचा पालखी चौक या चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे चौकाला शोभा आलेली आहे. शिवभक्त आणि भीमसैनिक शिवजयंती व आंबेडकर जयंती यावेळेला चौकामध्ये आकर्षक लाईटची रोषणाई केली जाते दोन्ही पुतळ्यास लाईट डेकोरेशन करून चौकाच्या चारी बाजूने आकर्षक लाइटिंग केले जाते त्यामुळे जयंती उत्सवात पालखी चौक अधिक शोभायमान दिसत असतो.
शिवजयंतीनिमित्त पालखी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्या करता अनेक शिवभक्त खास आवर्जून वेळापूर येथे येत असतात. दोन-तीन दिवस लाईट डेकोरेशन सुरू असते . पुणे पंढरपूर आणि सांगोला इंदापूर हे दोन रस्ते नेहमी वर्दळीचे असतात येणा जाणाऱ्या लोकांना नयनरम्य सोहळा पाहता येत असतो सर्व शिवभक्त शिवजयंती आनंदोत्सव सोळा सण असल्यासारखा साजरा करीत असतात. सर्व शिवभक्तांना आपण केलेले कार्यक्रम बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल संपादक शिवश्री,श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या क्रमांकावर पाठवावेत आपण केलेल्या शिवजयंती व सामाजिक उपक्रम प्रसार माध्यमातून समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng