वेळापूर (बारामती झटका)
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथील भूगोल विभागातील प्रा. मनोज नांगरे यांना “सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये ठिबक सिंचनाचा ऊस उत्पादनावरती होणारा परिणाम: एक भौगोलिक अभ्यास” या विषयात अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी प्रदान करण्यात आली. याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक श्री. विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सह सचिव हर्षवर्धन खराडे व इतर मान्यवरांनी प्रा. मनोज नांगरे यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह माने-देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दादा साठे, प्रा. रविंद्र माने, प्रा. बिटू मोलाणे – भोसले, प्रा. आशा गायकवाड, प्रा. पाडुरंग भोसले, प्रा. नानासाहेब वरकड, प्रा. उर्मिला कोडग, प्रा. अभिजीत घाडगे, ग्रंथपाल वैशाली मोरे, राजेंद्र बामने, रविंद्र साळुंखे इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng