वेळापूर येथील बनकर मळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी साधू पिसे यांची निवड.


वेळापुर ( बारामती झटका )

वेळापूर तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळा बनकर मळा या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी साधु पिसे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळा बनकर मळा वेळापूर या शाळेची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्घटन करण्यात आली यामध्ये साधू पिसे यांची अध्यक्षपदी तर सौ रोहिणी जन्मले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. महिला पालक सदस्य पदी सुवर्ण बनकर, उषा बनकर जानू शेख सारिका साठे यांची तर पुरुष पालक सदस्यपदी पोपट शेंडगे ,शिवाजी आडत, मालोजी बनकर यांची निवड करण्यात आली शिक्षक तज्ञ म्हणून विठ्ठल वाघे निवड करण्यात आली. सदर निवडीच्या कार्यक्रमावेळी समितीची रचना व कार्य याविषयी मुख्याध्यापक उत्तम कटके यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोरोची विद्यालयाच्या माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांच्या प्रीती भोजनासह स्नेहसंमेलनाचे आयोजन.
Next articleधर्मपुरी गावच्या सरपंच पदाचा कोणाकडेही पदभार अथवा सहीचा अधिकार दिलेला नाही – ग्रामपंचायत सदस्य सागर झेंडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here