वेळापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी नं १, वेळापूर शाळेचे पहिले विद्यार्थी स्व. चंद्रकांत दत्तात्रय माने देशमुख यांच्या ८९ व्या जयंतीचे औचित्य साधून माने देशमुख परिवाराच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. सूर्यकांतदादा यांचे थोरले बंधू स्व. चंद्रकांतदादा हे जि.प. शेरी नं १ शाळेत सन १९३९ साली विद्यार्थी म्हणून दाखल झाले होते. तसेच शेरी नं १ शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमृतराव माने देशमुख, अमरभाऊ माने देशमुख, आनंदबापू माने देशमुख व परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीमती सुमनदेवी चंद्रकांत माने देशमुख, श्रीमती शिलप्रभा सूर्यकांत माने देशमुख व श्रीमती उषाताई प्रकाश देशमुख यांच्या शुभहस्ते जि.प. शाळेतील व अंगणवाडीतील सुमारे ७५ विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहारही देण्यात आला. शाळेच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करुन शाळा प्रगतीपथावर नेल्याबद्दल चाँदसाहेब नदाफ, डाॅ. प्रेमनाथ रामदासी, प्रदीप कोरेकर व पांडुरंग वाघ या शिक्षकांचा विशेष सत्कार यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन पवार, श्री. रोहित माने देशमुख, श्री. विराज घार्गे, श्री. विक्रम माने देशमुख, श्री. संतोष थोरात, श्री. दिपक खुडे व पालक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng