वेळापूर येथील शिबिरात ५० जणांची तपासणी तर, १३ जणांचे मोफत ऑपरेशन होणार.

संविधान व शहीद दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी व नेत्ररोग तपासणी शिबिर राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न…

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील वेळापूर श्रीकृष्ण पतसंस्था याठिकाणी संविधान व शहीद दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी व नेत्ररोग तपासणी शिबिर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पनासे यांच्यावतीने व सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व सेवा सदन नेत्रालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये वेळापूर येथे ५० पेशंटची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑपरेशनची आवश्यकता असणारे १३ पेशंट आढळून आले. अमोल पनासे व सेवासदन नेत्रालय मिरज यांच्यावतीने त्यांच्यावरती लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ डॉ. साक्षी पाटील व डॉ. वैशाली वाटवे यांनी रुग्णांची तपासणी केली.

हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वेळापूर येथील पालखी चौकात असणाऱ्या श्रीकृष्ण पतसंस्था या ठिकाणी संपन्न होत आहे. या शिबिराचा वेळापूर व परिसरातील नागरिक लाभ घेत आहेत. आज योगायोगाने संविधान व शहीद दिन असल्याने दुग्ध शर्करा योग आलेला आहे. दोन्ही दिनामुळे आजच्या नेत्ररोग तपासणीला संविधान व शहिदांना अभिवादन करून नेत्र तपासणी शिबिरास सुरुवात केलेली आहे. वेळापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, युवा नेते अमोलराजे पनासे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने टेंभुर्णी येथे भव्य नोकरी मेळावा संपन्न
Next articleमतदारांचा कानोसा, लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. आशाताई ओवाळ यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची मतदारांची अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here