वेळापूर येथील शिबिरात 87 जणांची तपासणी, 25 जणांचे मोफत ऑपरेशन होणार

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पनासे यांच्यावतीने व सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व सेवा सदन नेत्रालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये वेळापूर येथे 87 पेशंटची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑपरेशन आवश्यक असणारे 25 पेशंट आढळून आले. अमोल पनासे व सेवासदन नेत्रालय मिरज यांच्यावतीने त्यांच्यावरती लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ डॉ. साक्षी पाटील व डॉ. वैशाली वाटवे यांनी रुग्णांची तपासणी केली.
हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वेळापूर येथील पालखी चौकात असणाऱ्या श्रीकृष्ण पतसंस्था या ठिकाणी संपन्न होत आहे.

या शिबिराचा वेळापूर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल पनासे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
Next articleहोमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमात ‘आधुनिक औषधशास्त्र’ विषयाचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here