दूधगंगा दूध संस्थेचे चेअरमन तानाजीराव मुंगूसकर पाटील यांना पितृशोक.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार हरिभाऊ शंकरराव मुंगूसकर पाटील यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दुधगंगा दूध संस्थेचे चेअरमन तानाजीराव मुंगूसकर पाटील यांचे ते वडील होते.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने पाटील यांच्याबरोबर त्यांनी वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये चार वेळा संचालक पदावर काम केलेले होते. सुसंस्कृत स्वभाव धार्मिक प्रवृत्तीचे आचारविचार होते. त्यांचा पेहराव धोतर, नेहरू आणि फेटा असा रुबाबदार असत. डौलदार चाल होती, त्यांच्या उंचीला व शरीरयश्टीला शोभून दिसत होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार वेळापूर येथील धानोरे रोड मुंगूसकर वस्ती येथे केलेले आहे. त्यांचा (तिसरा)) रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng