वेळापूर येथे अर्धनारीनटेश्वर देवाचा हळदी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूरसह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातून वेळापूरच्या यात्रेसाठी भाविक येत असतात. यात्रा गुढीपाडव्याला सुरू होत असली तरी, खऱ्या अर्थाने देवाच्या हळदी सोहळ्याने यात्रेस सुरुवात होत असते. शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून मंदिरामधील धार्मिक विधीस सुरुवात झाली. सुरुवातीला श्रीं ना गरम पाण्याने नंतर गार पाण्याने स्नान घालण्यात आले. यानंतर देवाचा मानाचा पोशाख गजानन वसेकर परिवाराने आणून दिला, तो घालण्यात आला. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट साधू नामदेव पिसे यांनी केली होती. यावेळी सर्व धार्मिक विधी गुरव कुटुंबीयांनी पार पाडला. हळदीच्या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे मोहन पालकर यांनी बांगड्या भरल्या तर, श्रीकांत होडगे व सौ. अनुराधा होडगे, सौ. राधीका श्रीकांत होडगे, सोनाली गाढवे, अनुराधा पोरे, सौ. दिशा मयूर होडके यांच्याकडून सुवासिनी महिलांची ओटी भरण्यात आली. सोहळ्याची विधिवत पूजा केल्यानंतर उपस्थित महिलांनी अर्धनारी नटेश्वराला हळद लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी देवाचे पुजारी असणारे गुरव कुटुंबातील पाच महिलांनी तसेच वेळापूरच्या सरपंच विमलताई जानकर, वसेकर परिवार, राधिका होडगे, दिशा होडगे यांनी देवाला तेल, हळद लावली. त्यानंतर देवाला मानाचा पोशाख परिधान करून आरती करण्यात आली. नंतर संध्याकाळी उपस्थित भाविकांना माळी समाजाच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हळदी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य पुजारी गौरीहर गुरव, सतीश गुरव, रविराज गुरव यांनी केले.

हळदी सोहळा पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुखदेव आडत (अंबानी), उपाध्यक्ष लखन मंडले आणि उमेश भाकरे, सचिव जीवन वाघे, काशिनाथ आडत, निवृत्ती भुसारे, शिवाजी सावंत, नागेश क्षीरसागर, शंकर आडत, विश्वास वाघे, शिवाजी मोहिते यांच्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी सहकार्य केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाढा तालुक्यातील 59 गावांना 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर – रणजितभैय्या शिंदे
Next articleगोरडवाडीचे ग्रामदैवत श्री बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here