वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथील आरपीआय आठवले गटाचे नेते मिलिंद उर्फ पप्पू सरतापे यांच्या मातोश्री कालकथित सुशिला वाल्मिक सरतापे यांचा प्रथम स्मृतिदिन गुरुवार दि. 17/02/2022 रोजी दुपारी 12 वा. आयोजित केलेला आहे. स्मृतिदिनानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर नगर येथील निवासस्थानी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे यांचा भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.
जगाला शांतीचा महान संदेश देणारे महाकरूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सप्रेम नमस्कार जय-भीम आपणांस कळविण्यात येते की, आमच्या मातोश्री कालकथित सुशीला वाल्मीक सरतापे यांचा प्रथम स्मृतिदिन आयोजित केलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे असे आयुष्यमान वैशाली व गौतम वाल्मिक सरतापे, आयुष्यमान मीनाक्षी व मिलिंद वाल्मीक सरतापे, अक्षय सरतापे, ओंकार सरतापे, शिवतेज सरतापे, महादेव सरतापे, समस्त सरतापे परिवार यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण आहे.
आपणापर्यंत हस्ते परहस्ते निमंत्रण धावपळीत, घाईगडबडीत मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आयुष्यमान मिलिंद उर्फ पप्पू सरतापे यांनी नम्र आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng