वेळापूर येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप ओबीसी मोर्चा माळशिरसकडून कार्यक्रमाचे आयोजन

वेळापूर (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ओबीसी मोर्चा माळशिरस तालुका यांच्यावतीने वृक्षारोपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्याहस्ते करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, भाजप ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष तथा माजी उपसरपंच शंकरराव काकुळे, रिपाइंचे तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे, भाजप ओबीसी तालुका उपाध्यक्ष संदीप घाडगे, वेळापूर केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. बी. ओवाळ, व्हा. चेअरमन सयाजी उघडे, रिपाइं नेते समाधान भोसले, व्हा.चेअरमन महादेव ताठे, ओंकार माने देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सुनिल मुंगूसकर, विरकुमार दोशी, माजी उपसरपंच मल्हारी बनकर, भाजप अ. ज. मोर्चा तालुका सरचिटणीस अजित साठे, भाजप वेळापूर शहर अध्यक्ष संजय पनासे, दिपक राऊत, आरोग्य सेवक सुनिल पुलगेट, राहुल माने देशमुख, दिपक माने देशमुख, अमोल व्होरा, महादेव म्हेत्रे, महादेव पिसे, गणेश म्हेत्रे, अजित बनकर, विकास माने, वेळापूर ग्राम. मुख्य लिपीक धनाजी धांडोरे, कर्मचारी सनी मुंगूसकर, सावता आडत, बालम कोरबू, चंदू राऊत, बाळासाहेब आडत, सोमनाथ चांडवले, सतीश बनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती नगरपरिषदेत कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न
Next articleमॉडेल विविधांगी प्रशालेत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने व टाळ्या वाजवून स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here