विकास सेवा सोसायटीच्या मतदारांच्या होम टू होम व बांधावर जाऊन सभासद शेतकऱ्यांच्या भेटीगाठी.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वेळापूर, ता. माळशिरस या संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्यांची निवडणूक सण 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. श्री अर्धनारीनटेश्वर शेतकरी विकास पॅनलने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. विकास सेवा सोसायटीच्या मतदारांच्या घरोघरी जाऊन होम टू होम व सभासद शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन भेटीगाठी घेऊन मतदानाचा प्रचार सुरू आहे.
वेळापूर विकास सेवा सोसायटी चे 13 व्यवस्थापक समिती सदस्य असतात. यासाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीचे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर श्री अर्धनारीनटेश्वर शेतकरी विकास पॅनलचे तेरा उमेदवार शंकरराव रामचंद्र माने देशमुख, सतीशराव दिगंबर माने देशमुख, मारूतराव गणपतराव माने देशमुख, नारायणराव कृष्णराव माने देशमुख, विजयसिंह रंगराव माने देशमुख, पांडुरंग गोविंदराव माने देशमुख, महादेव धोंडीबा भाकरे, माणिकराव वामन चव्हाण, हनुमंतराव शंकरराव साळुंके, रामचंद्र शंकर माने, अमृतराज सूर्यकांत माने देशमुख, शंकरराव ज्ञानेश्वर काकुळे, दत्तात्रय गेना बनकर, पांडुरंग दत्तू सावंत, धनंजय विष्णू भाकरे, तानाजी हरिभाऊ मुंगूसकर, सुरेश महादेव पिसे, प्रताप शिवलिंग शिरसागर, मल्हारी भगवान बनकर, मिलिंद वाल्मीक सरतापे, गिरीश पांडुरंग कुलकर्णी, शिवाजी भानुदास सावंत, विठ्ठल बाबा म्हेत्रे, चंद्रकांत भगवान आडत, उमेश दत्तात्रय बनकर, जगन्नाथ शिवराम गायकवाड, नेहरू बाबा मदने, सुखदेव जगू साठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अर्धनारी नटेश्वर शेतकरी विकास पॅनलचा प्रचार सुरू आहे. मतदान रविवार दि. 10/04/2022 रोजी सकाळी 08 ते दुपारी 04 वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची वेळापूर एसटी स्टँड जवळ येथे होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng