वेळापूर येथे श्री अर्धनारीनटेश्वर विकास पॅनलची प्रतिष्ठेची तर भाईनाथ महाराज परिवर्तन आघाडीच्या अस्तित्वाची लढाई.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 25 उमेदवार निवडणूक रिंगणात दोन पॅनल आमने-सामने.

वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झालेली असून 13 जागांसाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. श्री अर्धनारी नटेश्वर विकास पॅनलची प्रतिष्ठेची तर परमपूज्य भाईनाथ महाराज विकास परिवर्तन आघाडीच्या अस्तित्वाची लढाई आहे. दोन पॅनल आमने सामने निवडणुकीत उभे असल्याने सोसायटीच्या निवडणुकीत रंगत आलेली आहे.

परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडी अशोकराव शंकरराव माने देशमुख, श्री यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे यांच्यासह अनेकांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहेत. सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटामध्ये घाडगे मोहनराव गोविंदराव, घोरपडे भरत श्रीरंग, मंडले नारायण शंकर, माने देशमुख दिपक पांडुरंग, माने देशमुख मदनसिंह वसंतराव, पोळ आनंत नारायण, सावंत शिवाजी महादेव, महिला प्रतिनिधी गटात आडत सुलोचना तुकाराम, पन्नाशी सिंधुबाई हणमंत तर अनुसूचित जाती जमाती गटात बनसोडे रघुनाथ गणपत, भटक्या जमाती विभक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग गटात चोरमले दादा बाबा असे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

श्री अर्धनारी नटेश्वर विकास पॅनलचे शंकरराव माने देशमुख, सतीशराव माने देशमुख, अमृतराज माने देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवीत आहेत. सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात भाकरे अर्जुन नामदेव, देशपांडे श्रीधर वसुदेव, माने दत्तू बाजी, माने देशमुख अमरसिंह सुर्यकांत, माने देशमुख आनंदराव आबासो, माने देशमुख बाळासो गुलाबराव, माने देशमुख विश्वजीत रावसाहेब, ताटे महादेव रामचंद्र, महिला प्रतिनिधी गटात आडत मुक्ताबाई ज्ञानेश्वर, साठे राजसबाई पंढरीनाथ, अनुसूचित जाती जमाती गटात अडसूळ आप्पा लक्ष्मण, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात मिटकरी हरिदास भिमराव असे 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे 1198 मतदार सभासद आहेत त्यापैकी 200 ते 250 सभासद मयत आहेत. परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडी पॅनलला शिट्टी चिन्ह मिळालेले आहे, तर श्री अर्धनारीनटेश्वर विकास पॅनल यांना कपबशी चिन्ह मिळालेले आहे. मतदान दि. 10/04/2021 रोजी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. चार नंतर मतमोजणी होऊन निकाल होणार आहे. 35 वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक लागलेली असल्याने निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहे. दोन्ही पॅनल कडून निवडणुकीच्या व्युहरचना सुरू आहेत. प्रचाराच्या शुभारंभानंतर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्रीपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुखदेव साठे व सचिव विजयकुमार देशमुख यांचा सत्कार संपन्न
Next articleअकलूज पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह ? महिलांमधून पोलीस प्रशासनावर प्रचंड नाराजी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here