वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन व शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व संविधान वाचन व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर तसेच वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे साहेब यांच्या शुभहस्ते विविध उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे, विकासदादा धाईजे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, महिला तालुकाध्यक्ष सीमाताई एकतपुरे, उपसरपंच जावेद मुलाणी, राष्ट्रवादीचे नेते वसंतराव पाटील, डॉ. ओव्हाळ, जिल्हा सरचिटणीस किरण साठे, डॉ. कुमार लोंढे, धानोरे गावचे सरपंच जीवन जानकर, रेखाताई कांबळे, निताताई सुळे, सुभेदार निशिकांत शिंदे, मेजर भीमराव इंगोले, मेजर प्रदीप वसेकर, वेळापूर ग्रामसेवक गोरे, पवार आर. बी. सर, अशोक पवार सर, बाबासाहेब माने, तालुकाध्यक्ष रजनीश बनसोडे, रिपाईचे मिलिंद सरतापे, विजय बनसोडे, गणेश साठे, हनुमंत वायदंडे, संजय पन्नासे, संजय मंडले, रिपाईचे रविराज बनसोडे, संजय वाघमोडे, सुरज अवघडे, राजकुमार बनसोडे, नितीन लोंढे, राजकुमार जाधव, महेंद्र साठे, निशिकांत बनसोडे, विजय सोहनी, मिलिंद गायकवाड, दत्ता वाघमारे, राहुल आप्पा वाघमारे, महेश साठे, दादासाहेब गालफाडे, सौरभ वाघमारे, राहुल सराटे, अजित बनकर, प्रदीप सरोदे, विठ्ठल जाधव, कुमार लोखंडे, विठ्ठल माने, वैभव बनसोडे, स्वप्निल सर्वदे, शुभम लोंढे, दीपक आयरे, शुभम आठवले, न्यू इंग्लिश स्कूल वेळापूर जिल्हा परिषद शाळा मुले व मुली जिल्हा परिषद उर्दु शाळा, लोक विकास शिक्षण संस्था वेळापूर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng