वेळापूर (बारामती झटका )

वेळापूर ता. माळशिरस येथे साम्राज्य कलेक्शन ब्रँडेड शोरूमचा शुभारंभ शुक्रवार दि. १५/१०२०२१ रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १० वा. वेळापूर गावचे माजी सरपंच हनुमंतराव साळुंखे व युवा नेते स्वप्निल भैया देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी दादा शिंदे, सौरभ शिंदे, बाळकृष्ण शिंदे, सुखदेव शिंदे, हनुमंत शिंदे, तानाजी शिंदे, दीपक शिंदे, दत्तू शिंदे, नामदेव घोरपडे, अजित काटे, आण्णा माने, विनोद शिंदे, आकाश घोरपडे, ओंकार घोरपडे, नवनाथ शेजाळ, सचिन शेजाळ, दादा शेजाळ, सचिन वाळेकर, सुनील खरात, पवन भगत आदी मान्यवर उपस्थित होते.वेळापूर येथील शिंदे बंधू यांनी साम्राज्य कलेक्शन ब्रांडेड शोरूम मेन रोड, नवीन बाजारतळ, ज्योतिबा मंदिरासमोर, वेळापूर येथे सुरू केलेले आहे. साम्राज्य कलेक्शनमध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड शर्ट, टी शर्ट, जीन्स, मेन्स वेअर आणि चिल्ड्रन्स वेअर अशाप्रकारे रेडीमेड कपडे मिळणार आहेत. ग्रामीण भागामधील युवकांसाठी पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी ज्या नवनवीन ब्रँडेड कपड्यांच्या व्हरायटी बाजारात येत असतात अशा सर्व नवनवीन व्हरायटीज साम्राज्य कलेक्शनमध्ये मिळणार आहेत. ग्रामीण भागात ब्रँडेड कपड्यांचे शोरूम सुरू झालेले असल्याने तरुणांची फॅशन, कपड्याची हाऊस पूर्ण होणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर साम्राज्य कलेक्शनच्या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
