अपंग शेतकऱी बांधवांनी सोलार कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा – गोरख जानकर.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर येथील सचिन महादेव देशमुख यांनी आपल्या शेतामध्ये दोन सोलर पंप बसवले त्याचा उद्घाटन समारंभ रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी तरंगफळ असे सामाजिक कार्यकर्ते नारायण ऊर्फ तात्यासाहेब तरंगे माजी सरपंच सुजित तरंगे मानसिंग मगर शंभूराजे देशमुख सचिन देशमुख रेवन इंगळे नितीन सावंत श्रीयुत कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गोरख जानकर यांनी सचिन देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करून अपंगांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng