भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विजयी उमेदवार व सभासदांचे आभार मानले तर विजयाचे चाणक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना वाढदिवसाची सभासदांनी विजयाची भेट…
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर विकास सेवा सोसायटी मर्यादित वेळापूर, ता. माळशिरस या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाचा दणदणीत विजय झालेला आहे, तर विरोधकांचा धुव्वा उडालेला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोसायटीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांचे आणि पॅनलमधील सर्व प्रमुख नेतेमंडळीसह सभासदांचे अभिनंदन केले आहे. वेळापूर सेवा सोसायटीच्या विजयाचे चाणक्य भाजपचे जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाची सभासदांनी संस्थेच्या सर्व संचालकांना मतदान करून विजयाची भेट दिलेली आहे.
वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीत 13 जागांसाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. श्री अर्धनारी नटेश्वर विकास पॅनलची प्रतिष्ठेची तर परमपूज्य भाईनाथ महाराज विकास परिवर्तन आघाडीच्या अस्तित्वाची लढाई होती. दोन पॅनल आमने सामने निवडणुकीत उभे असल्याने सोसायटीच्या निवडणुकीत रंगत आलेली होती.
परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडी अशोकराव शंकरराव माने देशमुख, श्री यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे यांच्यासह अनेकांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविलेली होती. सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटामध्ये घाडगे मोहनराव गोविंदराव 347, घोरपडे भरत श्रीरंग 320, मंडले नारायण शंकर 313, माने देशमुख दिपक पांडुरंग 332, माने देशमुख मदनसिंह वसंतराव 335, पोळ आनंत नारायण 314, सावंत शिवाजी महादेव 311, महिला प्रतिनिधी गटात आडत सुलोचना तुकाराम 328, पनासे सिंधुबाई हणमंत 319, अनुसूचित जाती जमाती गटात बनसोडे रघुनाथ गणपत 325, भटक्या जमाती विभक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग गटात चोरमले दादा बाबा 330 इतर मागास प्रवर्ग शंकर नामदेव आडत 369 अश्या 12 उमेदवार मते पडलेली आहेत.
श्री अर्धनारी नटेश्वर विकास पॅनलचे शंकरराव माने देशमुख, सतीशराव माने देशमुख, अमृतराज माने देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवीत आहेत. सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात भाकरे अर्जुन नामदेव 476, देशपांडे श्रीधर वासुदेव 473, माने दत्तू बाजी 472, माने देशमुख अमरसिंह सुर्यकांत 502, माने देशमुख आनंदराव आबासो 474, माने देशमुख बाळासो गुलाबराव 469, माने देशमुख विश्वजीत रावसाहेब 467, ताटे महादेव रामचंद्र 466, महिला प्रतिनिधी गटात आडत मुक्ताबाई ज्ञानेश्वर 500, साठे राजसबाई पंढरीनाथ 479, अनुसूचित जाती जमाती गटात अडसूळ आप्पा लक्ष्मण 528, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात मिटकरी हरिदास भिमराव 514, इतर मागास प्रवर्ग चंद्रकांत शिवलिंग शिरसागर 496 असे 13 उमेदवार मते पडलेली आहेत.
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे 1198 मतदार सभासद आहेत. त्यापैकी 880 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता 90% झालेली होती. सहाय्यक निबंधक कार्यालयातील डी. पी. राऊत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली. शांतता व सुव्यवस्था राखून निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरता अकलूज उपविभागीय अधिकारी पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून सदरची यादी चेअरमन अमरसिंह सूर्यकांत माने देशमुख यांना देण्यात आले. श्री अर्धनारी नटेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजयानंतर वेळापूर परिसर फटाक्यांच्या आतषबाजीने दणाणून सोडलेला होता. विशेष करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकामध्ये फटाक्यांची व गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सर्व विजयी उमेदवार वाजत गाजत ग्रामदैवत श्री अर्धनारीनटेश्वर व गावातील सर्व मंदिरांना देवदर्शनासाठी रवाना झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng