वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे २०२१—२०२२ कर्ज वसुली १०० टक्के झाली असल्याचे वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी सांगितले. यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, सोसायटीचे संचालक श्रीधर देशपांडे, अर्जुन भाकरे, आनंदराव माने देशमुख, दत्तू माने, बाळासाहेब माने देशमुख, विश्वजीत माने देशमुख, आप्पा आडसुळ, चंद्रकांत क्षीरसागर, हरिदास मेटकरी, मुक्ताबाई आडत, राजसबाई साठे तसेच सोसायटीचे सचिव भागवत मिले, शिवाजी आडत, दत्तात्रय मेहत्रे आदी उपस्थित होते.
वेळापूर विकास सेवा सोसायटीला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर भाजपा जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे कामकाज चालू आहे.

सदर सोसायटीची स्थापना १९२५ साली झाली आहे. सदर संस्था शतकाकडे वाटचाल करत असून या संस्थेची वार्षिक उलाढाल ४ कोटी रुपये इतकी आहे. सदर संस्था बँक कर्ज बार करने कामे संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेव भाऊ ताटे, संस्थेचे सर्व संचालक, सचिव, कर्मचारी वर्ग, वेळापूर जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng