परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीचा सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वेळापूर, ता. माळशिरस, या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2021- 22 ते 2026- 27 या सालाकरिता 13 जागांची निवडणूक लागलेली आहे. श्री अर्धनारी नटेश्वर शेतकरी विकास पॅनल व परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडी असे दोन पॅनल समोरासमोर उभे आहेत. परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीचा सत्तापरिवर्तन करण्याचा निर्धार आहे. सोसायटीच्या मतदारांपर्यंत शिट्टीचा आवाज घुमला असून भविष्यात संधी दिल्यास सभासदांसाठी त्यांनी उद्दिष्ट ठेवलेली आहेत.
श्री अर्धनारी नटेश्वर महादेवाचा हळदी, लग्न सोहळा, जागरण गोंधळ असा श्रींचा मोठा कार्यक्रम असतो. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर श्रींचा प्रसाद त्यामध्ये बालाजी महाप्रसादासारखे मोठे दोन लाडू व पॅनलची भविष्यातील उद्दिष्टे यांची माहिती असणारे माहितीपत्रक सभासदांच्या घरोघरी जाऊन दिले आहे.
परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीचे प्रकाशक प्रमोद वसंतराव माने देशमुख, काशिनाथ गेना आडत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी उमेश भानवसे, विश्वास प्रभाकर वाघे, सुखदेव महादेव आडत (अंबानी), जीवन मधुकर वाघे, संदीप माने देशमुख, शहाजी रामचंद्र कदम, बाळासाहेब नारायण घाडगे, दशरथ आप्पा बनकर, रामकृष्ण जाधव, रमेश काका अष्टपुत्रे, रवींद्र गजानन चव्हाण, पांडुरंग वसंतराव पनासे, शिवाजीराव नामदेव मोहिते, संजय पांडुरंग मंडले, वसंत विश्वनाथ क्षीरसागर, रामराजे माने देशमुख, उदय माने देशमुख, दादा महादेव म्हेत्रे, महादेव मगर, मधुकर नवले, आनंद तुपे, चांगदेव सावंत, संतोष जगन्नाथ गायकवाड, लखन मंडले, डॉ. अमोल कोळेकर, माणिक मदने, प्रशांत खराडे, हर्षल बनसोडे, परशुराम मुळीक, शकूर पठाण, शिवाजी वाघमारे, शैलेश भाकरे, सचिन भाकरे, बापुराव वाघमारे, विष्णू आडत, बाबुराव चव्हाण, शंकर सखाराम पिसे, आप्पा कांबळे, बबन एकनाथ जाधव, उमेशकाका इंगळे, विवेकानंद भगत, सतिश पिसे अशी नावे असलेल्या अजेंड्यामध्ये उद्दिष्ट आहेत.

सभासद शेतकऱ्यांसाठी खरेदीच्या घरांमध्ये युरिया खते, बी-बियाणे, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सेवा केंद्र सुरू करणे, प्रत्येक सभासदांना तीन लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा व पाच लाख रुपयाचा अपघाती विमा मोफत उतरविण्यात येणार, सभासदांच्या मुला-मुलींचे लग्न ठरल्यानंतर कर्ज मागणी केल्यास एक जामीनदार घेऊन त्वरित एक लाख रुपये कर्ज रोख मंजूर केला जाईल, सोसायटीच्या आवारातील गोडाऊन दुरुस्त करून सभासदांना मिनी मंगल कार्यालय मोफत देणार, सभासदांना विविध प्रकारची अवजारे, ड्रोन फवारणी यंत्र माफक दरात भाड्याने देण्यात येणार, सभासदांच्या वारसांना त्वरित सभासद करून कर्ज वाटप केले जाईल, शासन कर्जमाफी झालेल्या सभासदांना पुन्हा कर्ज रोख वाटप करणार, पूर्वीप्रमाणे डिव्हीडंट सभासदांना वाटप केला जाईल, जुन्या गाळ्यांचा फेर लिलाव न करता नवीन गाळ्याची निर्मिती करून माफक दरात गाळे भाडे घेण्यात येईल, संस्थेची रेशन दुकाने डिजिटल करणार, शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला व इतर मालाला जास्त किंमत मिळवून देण्यासाठी फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करणार, दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत नियमित कर्ज फेडणाऱ्या व उच्च उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जाईल, अशी उद्दिष्ट असलेले पोम्प्लेट त्यावर लिहिलेले आहे “एकच ध्यास, परिवर्तन हाच विकास” शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीचे अशोकराव शंकरराव माने देशमुख, यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे, संदीपतात्या माने देशमुख यांच्यासह अनेकांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रचार यंत्रणा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng