वेळापूर विकास सोसायटीने राज्यात आदर्श निर्माण केला – माधवराव माने देशमुख

वेळापूर (बारामती झटका)


कोरोना महामारीच्या काळात संस्था अडचणीत असतानाही लाभांश वाटप करुन वेळापूर विकास सोसायटीने राज्यात आदर्श निर्माण केला आहे,असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सदस्य माधवराव माने देशमुख यांनी केले.

वेळापूर विकास सेवा सोसायटीच्या वतीने लाभांश वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता . त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेवून संस्थेने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १३ वर्षे १५ टक्के लाभांश वाटप केला आहे . यामध्ये सभासदांचा मोठा सहभाग आहे . संस्थेला अहवाल सालात २० लाख नफा झाला आहे . संस्थेचे १२५० सभासद असून राखीव निधी १ कोटी ६५ लाख , बॅंक शेअर्स ३० लाख ५० हजार , मुदत ठेव २५ लाख व कर्ज वाटप ४ कोटी असून सरकारने कर्ज माफी जाहिर केली . नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला . रेग्युलर सभासदांना प्रोत्साहनपर ५० हजार देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले काय ते त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
लाभांश वाटप सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव माने देशमुख , पांडूरंगराव माने देशमुख , माधवराव माने दे. यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संचालक आनंदराव माने दे. ,बाळासाहेब माने दे., बाळासाहेब घाडगे,शहाजी कदम,शिवाजी सावंत,चंद्रकांत क्षिरसागर,ज्ञानेश्वर आडत,शंकरराव आडत,अर्जून भाकरे, हरिभाऊ माने दे., ओंकार माने दे., दत्तात्रय माने , पांडुरंग माने दे., दत्तात्रय बनकर , वीरकुमार दोशी , रंगनाथ माने , मोहन पालकर , दशरथ मंडले , नवनाथ इंगळे , अनंत माने दे., लक्ष्मण सावंत , सतीश नवले , पांडुरंग खराडे, लक्ष्मण केंगार , अजिनाथ अडसूळ , माणिक मदडे, विनायक इंगळे , संभाजी माने दे., नंदकुमार मांडवे, गिरीश कुलकर्णी , चंद्रकांत पिसे, नंदकुमार पाटील, संस्थेचे सचिव भागवत मिले, क्लार्क शिवाजी सावंत, शिपाई संजय करमाळकर, सह सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक व आभार व्हाईस चेरअमण महादेव भाऊ ताटे यांनी केले.

आघाडी सकरकाने शेतकऱ्यांना व रेगुलर सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये लवकरात द्यावे – अमरसिंह माने दे.

माझ्या १५ वर्षाच्या कारकिर्दीत सलग १३ वर्षे १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सभासदांचा मोठा सहभाग आहे ,चालू वर्षी २० लाख नफा झाला असुन सभासद संख्या १२५० झाली, संस्थेची मुदत ठेव २५ लाख एवढी आहे , तर राखीव निधी १ कोटी ६५ लाख एवढा आहे , तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक कडे ३० लाख ५० हजार रुपयाची शेअर्स आहेत,संस्थेने आतापर्यंत ४ कोटीचे कर्ज वाटप केले , असुन वसूल १०० टक्के बँक लेव्हल आहे.      महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते , की जे शेतकरी रेग्यूलर कर्ज भरतात अशा सर्व सभासद शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जाणार होते ते तात्काळ मिळावे अशी विनंती विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने दे.यांनी या कार्यक्रमादरम्यान केली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला.असुन रेग्युलर सभासदांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये त्वरीत द्यावे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्मृती क्रिकेट क्लबच्या वतीने शिवपुरी येथे भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
Next article‘स्वेरी’मध्ये बुधवारी लसीकरण शिबिराचे आयोजन संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here