वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 13 जागांसाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

वेळापूर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित केळापूरची व्यवस्थापक समिती निवडणूक 20 21 – 22 ते 20 26 – 27 या पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असून 29 /03/2022 अखेर प्राप्त नाम निर्देश पत्र 13 जागांसाठी 29 उमेदवारांनी आपले नाम निर्देश पत्र भरलेली आहेत.
विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मधून अमरसिंह सूर्यकांत माने देशमुख, महादेव रामचंद्र ताटे, आनंदराव आबासो माने देशमुख, श्रीधर वासुदेव देशपांडे, बाळासो गुलाबराव माने देशमुख, अर्जुन नामदेव भाकरे, दत्तू बाजी माने, विश्वजीत रावसाहेब माने देशमुख, भारत श्रीरंग घोरपडे, मोहनराव गोविंदराव घाडगे, नारायण शंकर मंडले, विठ्ठल भगवान पिंगळे, मदनसिंह वसंतराव माने देशमुख, अनंत नारायण पोळ, विष्णु भगवान आडत, शिवाजी महादेव सावंत, दीपक पांडुरंग माने देशमुख, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी साठी आप्पा लक्ष्मण अडसूळ,विकास सारस्वत बनसोडे, रघुनाथ गणपत बनसोडे, महिला प्रतिनिधी साठी मुक्ताबाई ज्ञानेश्वर आडत, राजसबाई पंढरीनाथ साठे, सुलोचना तुकाराम आडत, सिंधुताई हनुमंत पनासे, इतर मागास प्रवर्गासाठी चंद्रकांत शिवलिंग क्षीरसागर, शंकर नामदेव आडत, भटक्या जमाती/ विमुक्त जाती/विमाप्र साठी भीमराव दत्तू मिटकरी, दादा बाबा चोरमले, हरिदास भिमराव मेटकरी अशा 29 उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र भरलेली आहेत निवडणूक निर्णय अधिकारी पीडी राऊत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी एम मिले निवडणुकीचे काम पाहत आहेत. सोसायटीचे मतदार सभासद संख्या 11 98 आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 29 मार्च पर्यंत आहे मतदान 9 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.


वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्वातंत्र्यपूर्व काळात 1925 सालची स्थापना आहे. सदर संस्थेवर सलग 36 वर्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती वेळापूर नगरीचे ज्येष्ठ नेते लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती. सूर्यकांत दादांनी सोसायटीमध्ये कधीही राजकारण आणलेले नव्हते. सभासदांचे हित हेच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सोसायटीचा कारभार केलेला होता पूर्वीच्याकाळी सोसायटी मधून राजकारण चालत होते परंतु सूर्यकांत दादाने राजकारण विरहित सोसायटीचा कारभार चालविला होता. वेळापूर मोठ्या लोकसंख्येचे गाव असतानासुद्धा मोठ्या गावांमध्ये एकच सेवा सोसायटी सूर्यकांत दादा यांनी सर्व समाज घटकांना सामावून घेतलेले असल्याने मोठ्या गावाला एकच सोसायटी आज सुद्धा अस्तित्वात आहे. स्वर्गीय सुर्यकांत दादा यांनी घालून दिलेला आदर्श आणि त्यांनी जोपासलेले सभासदांचे हित त्यांच्या पश्चात अमरसिंह माने देशमुख यांनी सर्व सभासदांच्या सहकार्याने सांभाळले आहे. अमर भाऊ यांच्याकडे 2007 साली सूर्यकांत दादांच्या पश्चात चेअरमनपदाची जबाबदारी आलेली होती सूर्यकांत दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनमहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन व माळशिरस तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमरसिंह माने देशमुख यांनी सोसायटीचा कारभार सर्व संचालक व सभासद यांना विश्वासात घेऊन पंधरा वर्ष केलेला आहे त्यांनी 13 वेळा 15 टक्के डिव्हीडंट सभासदांना वाटप केलेला आहे. सोसायटीची स्वतःची इमारत असून 14 गाळे उभारून व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोध होणारी निवडणूक या पंचवार्षिक निवडणुकीला 13 जागांसाठी 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले असल्याने तीन अतिरिक्त अर्ज सोडले तर समोरासमोर लढत होण्याची शक्यता आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी स्वर्गीय सागर गोविंद गायकवाड यांच्या परिवारांची घेतली सांत्वनपर भेट.
Next articleरत्नत्रय शैक्षणिक संकुलमध्ये इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here