सुर्यकांतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अमरभाऊ यांनी सभासदांचे हित जोपासले व विश्वास संपादनाचा विजय आहे – नूतन संचालक श्रीधर देशपांडे.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री अर्धनारी नटेश्वर शेतकरी विकास पॅनल यांनी परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव करून दणदणीत विजय मिळविल्यानंतर वेळापूर येथील वीरशैव लिंगायत समाजाचे नेते श्रीकांतदादा होडगे यांनी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, नूतन संचालक चंद्रकांत शिवलिंग क्षिरसागर, श्रीधर वासुदेव देशपांडे यांचा सन्मान श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकातील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी समाजातील व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

श्रीकांतदादा होडगे यांच्या सत्कारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नूतन संचालक श्रीधर होडगे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत माने देशमुख उर्फ सूर्यकांतदादा यांनी सोसायटीचा 35 वर्ष चेअरमनपदाची धुरा सूर्यकांत दादांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून ठेवून सभासदांची हित जोपासले व विश्वास संपादन केला. त्यांच्या पश्चात अमरभाऊ यांनी दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोसायटी चांगल्या पद्धतीने चालवून सभासदांचे हित जोपासले. गेली पंधरा वर्षे सतत पंधरा टक्के डिव्हीडंट सभासदांना दिला जात आहे. अमरभाऊ यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या ज्येष्ठ संचालक व सभासद यांच्या सहकार्याने बंधू अमृतभैय्या यांच्या मदतीने सोसायटीचा चांगला कारभार करून कायम 100% वसुली मध्ये सोसायटी राहिलेली आहे.

बिनविरोध होत असलेली सोसायटीची परंपरा खंडित करून विरोधकांनी स्वार्थापोटी निवडणूक लावली. मात्र, सभासद मतदार यांनी त्यांची त्यांना जागा दाखवून दिलेली आहे. भविष्यामध्येही सभासद सूर्यकांतदादांच्या विचाराचा वारसा जपतील असा विश्वास नूतन संचालक श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng