वैष्णवी काळे हिच्या वाढदिवसानिमित्त संभाजी बाबा मंदिर येथे भाविकांना खिचडी व केळीचे वाटप होणार.

वाढदिवसाचा वायफट खर्च न करता महाशिवरात्री निमित्त संभाजी बाबांच्या दर्शनास येणाऱ्या भाविक भक्तांना कु. वैष्णवी काळे हिच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

माळशिरस ( बारामती झटका )

भांब ता. माळशिरस गावचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू यांची कन्या वैष्णवी हिचा वाढदिवस दि. 01/03/2022 रोजी आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महाशिवरात्री यात्रा आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचे आराध्य दैवत असणारी सुप्रसिद्ध भांब येथील संभाजी बाबा मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या भाविकांना खिचडी व केळीचे वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसाचा वायफट न खर्च करता महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांना वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानासारख्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.

भांब गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू यांची कन्या वैष्णवी हिचा जन्म 01/03/2015 साली झालेला आहे. यावर्षीचा तिचा सातवा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त भांब गावचे माजी सरपंच पै. धनाजी ज्ञानदेव काळे व नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सदस्य व सुप्रसिद्ध डॉ. नरेंद्र कवितके यांच्या सहकार्याने वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त संभाजी बाबा दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी खिचडी व केळीचे वाटप करण्यात येणार आहे.


प्रफुल्ल पांडुरंग काळे यांनी गेल्यावर्षी संभाजी बाबा मंदिराकडे भाविकांना जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याने पप्पू काळे यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडेझुडपे काढली होती. त्या ठिकाणी मुरूम टाकलेला होता. भाविकांना संभाजी बाबांपर्यंत पोहोचण्याची अडचण दूर केलेली होती. यावर्षी संभाजी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व केळीचे वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम मित्रांच्या सहकार्याने केलेला असल्याने या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.


पप्पू काळे यांची लाडात वाढलेली वैष्णवी हिच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजहिताचे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. कु. वैष्णवीचा वाढदिवस परिसरातील लोकांच्या सामाजिक उपक्रमामुळे कायम स्मरणात राहतो. वैष्णवी हिच्या वर पप्पू काळे यांचे जीवापाड प्रेम आहे. वडिलांचे कर्तव्य पप्पू काळे लहानपणापासून बजावत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नियुक्ती.
Next articleकोथळे गाव रस्त्याच्या गैरसोईमुळे विकासापासून वंचित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here