शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार, औपचारिक घोषणा बाकी.

अकलूज (बारामती झटका)

शंकरराव मोहिते पाटील शेतकरी सहकारी बँक लि. अकलूज, ता. माळशिरस, या बँकेची पंचवार्षिक निवडणूक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झालेली असून औपचारिक घोषणा बाकी राहिलेली आहे.

शंकरराव मोहिते पाटील शेतकरी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे उमेदवारी अर्जाची छाननी होऊन 13 जागांसाठी 14 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील, श्री. सतीश संभाजी पालकर, श्री. विजय कृष्णात मगर, श्री. विठ्ठल गोरख इंगळे, श्री. निवृत्ती मारुती निंबाळकर, श्री. सुदर्शन माणिक मिसाळ सौ. लतिका वसंतराव गायकवाड, श्री. नितीन बलभीम घोडके, श्री. हनुमंत तुकाराम वाघमोडे, श्री. चंद्रकांत गुलाबराव इनामदार, श्री. विवेक रामचंद्र गवळी, श्री‌. मारुती तानाजी लोखंडे, सौ. संगीता दत्तात्रय एकतपुरे असे उमेदवारी अर्ज वैध झालेले आहेत. त्यामधील एक अर्ज माघारी घेतल्यानंतर 13 जागांसाठी 13 उमेदवार यांचे अर्ज राहिल्यानंतर सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एल. एम. शिंदे बिनविरोध संचालक मंडळाची घोषणा करतील.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे दु:खद निधन
Next articleअकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप बुद्रुक समावेश तर शिवसेना वंचित राहणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here