माळशिरस तालुक्यातील प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांचा झुम मिटिंगमध्ये समावेश.
मुंबई ( बारामती झटका )
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत झूम ॲपद्वारे मीटिंग आयोजित केलेली होती सदर मिटिंग मध्ये माळशिरस तालुक्यातील प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांचा झूम मीटिंगमध्ये समावेश होता.

दीपावली व कोरूना च्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत राव पाटील यांनी झूम ॲपद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झूम बैठक घेतलेली होती महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली अनेक पदाधिकारी आपापल्या तालुक्यातील सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.

बराच वेळ चाललेल्या झूम मीटिंग कडे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे झूम मिटिंग वर बारीक लक्ष होते नामदार जयंतराव पाटील यांनी पक्षाची ध्येयधोरणे निवडणुकीतील पुढील रणनीती याविषयी पदाधिकारी यांना माहिती दिली माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अद्यावत माहिती प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांनी झूम मीटिंग द्वारे देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng