शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळा कदमवाडी नं. 2 येथे संपन्न.

तांदुळवाडी (बारामती झटका)

‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सक्षमीकरण केंद्रस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. १०/०३/२०२२ ते ११/०३/२०२२ या कालावधित जि.प.प्रा. शाळा कदमवाडी नं. 2 येथे करण्यात आले होते. सुरवातीला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तांदुळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच शशिकांत कदम हे उपस्थित होते. त्यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यशाळेची सुरवात केली. सोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कदम, ह.भ.प.म. एकनाथ चौगुले, केंद्रप्रमुख शैलजा जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक मुजम्मील जमादार आदी उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक दिपक परचंडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेचा आत्मा व महत्वाचा कणा आहे. यावरचं शाळेचा विकास अवलंबून असतो. अध्यक्षीय भाषणात शशिकांत कदम यांनी ही कार्यशाळा सर्व सदस्यांनी पुर्ण करावी, असे आवाहन केले.

या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती रचना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, गुणवत्तापुर्ण शिक्षण व SMC ची जबाबदारी, निपुण भारत अभियान, बालकांचे हक्क व सुरक्षितता, शालेय आपत्ती व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन, शाळा विकास आराखडा, शाळेचे सामाजिक अंकेक्षण या विषयावर कार्यशाळेचे सुलभक ज्ञानेश्वर करांडे व बाळूसो लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तांदुळवाडी व मळोली महसूल मधिल शाळा व्यवस्थापन सदस्यांनी सहभाग घेतला.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कदमवाडी नं.2 चे उपाध्यक्ष सिताराम खुळे, अमोल माने, सतिश बाबर, सोपान लेंगरे, सुनिल बाबर, दत्ताञय ढोरे, विजय पारसे, सुनिल गायकवाड, प्रांजली कदम, चैताली कदम, मुख्याध्यापक सदाशिव मिसाळ यांनी परीश्रम घेतले. कार्यशाळेच्या शेवटच्या समारोप सञात संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादीच्या नेत्या रंजनाताई हजारे यांचेकडून अनोखी मदत
Next articleछत्रपती संभाजी महाराज पराक्रमी,नीतिमान राजे – डॉ. श्रीमंत कोकाटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here