सोलापूर जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार मॅडम यांची माहिती.
सोलापूर ( बारामती झटका)
विविध प्रकारच्या दाखल्यासाठी तसेच विविध कामकाजासाठी शासकीय कार्यालय व न्यायालयासमोर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच राज्य शासनाने २००४ मध्ये शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी शासकीय कार्यालय व न्यायालयासमोर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना नागरिकांकडून मुद्रांक शुल्काची मागणी करू नये, असे निर्देशही निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng