शिक्षक संघाचे शिक्षक, शाळा, विद्यार्थी पुरस्कार प्रदान

प्रशांत सरूडकर ठरले जीवनगौरवचे मानकरी

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी आणि समविचारी शिक्षक परिवाराकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सहकार महर्षी जीवनगौरव पुरस्कार, संवेदनशील पुरस्कार, उत्कृष्ट शाळा पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठी प्रतिभागौरव पुरस्कार, क्रीडा शाळा पुरस्कार, कलाविष्कार शाळा पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्षक नेते कै. वसंतराव मगर गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी तालुका शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक सन्मान पुरस्कार वितरित होतात. यावर्षीचा मानाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जीवन गौरव पुरस्कार नातेपुते केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख तथा इतिहास तज्ञ आणि बालभारतीच्या इतिहास पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य प्रशांत सरूडकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सरूडकर यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई वाघमोडे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, कार्यकारी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, नपा-मनपा सरचिटणीस संजय चेळेकर, सल्लागार लहू कांबळे, मार्गदर्शक तात्यासाहेब यादव, अशोक मगर, हनुमंत पवार, दिलीप ताटे, जय विजय परिवाराचे सुभाष मिसाळ, एकल शिक्षक मंच जिल्हाध्यक्ष इकबाल नदाफ, शिक्षक समितीचे शरद रुपनवर, जुनी पेन्शनचे किरण काळे उपस्थित होते.

अकलूज शिक्षक संघ आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जीवन गौरव पुरस्कार इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर यांना प्रदान करताना मदनसिंह मोहिते पाटील.

यावेळी मान्यवरांनी मगर गुरुजींच्या कार्याला उजाळा देणाऱ्या शिक्षक संघाच्या शिक्षक-शाळा कौतुक सोहळ्याचे कौतुक केले. जीवनगौरव प्राप्त प्रशांत सरूडकर यांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महिला शिक्षक संघाच्या वतीने आणि चंदुकाका अँड सराफ यांनी प्रायोजित केलेल्या महिला स्नेह मेळावा आणि तिळगुळ वाटप कार्यक्रमाचेही आयोजन केले गेले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाची तालुका कार्यकारणी, राजेंद्र वायसे, राजेंद्र उकिरडे, राम काटकर, उमाजी माने, सचिन बरडकर, रमेश सरक, सुरेश कुंभार, बाळासाहेब शिंदे, दगडू पवार, लालासाहेब गायकवाड, पोपट पालवे, अण्णा मगर, अर्जुन पिसे यांनी योगदान दिले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष विजय शिंदे यांनी केले तर, आभार सरचिटणीस मनोहर एकतपुरे यांनी मानले. यावेळी सूत्रसंचालन राजाराम गुजर आणि सुहास उरवणे यांनी केले.

जिल्हा आणि राज्य संघ माळशिरस तालुका शिक्षक संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जिल्हा पतसंस्थेत कोणाचीही अडवणूक होऊ देणार नाही. – मच्छिंद्रनाथ मोरे, अध्यक्ष, जिल्हा शिक्षक पतसंस्था

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवडशिवणे येथे ग्रामसभा ठरावात दारूबंदी, मटका व जुगार बंदी करण्यात आली
Next articleधर्मवीर आनंद दिघे हे देशाचे आदर्श – पत्रकार नासिरभाई कबीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here